Election Results : नागपुरात गडकरी आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत. 

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली. 

नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत. 

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली. 

गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भावी पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे बघितल्या जात आहे. मागील निवडणूक त्यांनी सुमारे पावणेतीन लाखांच्या मताधिक्‍याने जिंकली आहे. यामुळे ते यावेळी किती मताधिक्‍य घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गडकरी यांनी तीन ते साडेतीन लाखांचे मताधिक्‍य मिळेल असा दावा केला आहे. नागपूरमधील कॉंग्रेसमधील भांडणे आणि शहरातील कुणबी आणि ओबीसी समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊन कॉंग्रेसने भंडारा मतदारसंघाचे माजी खासदार नाना पटोले यांना रिंगणात उतरवले. त्यांनी नागपूरच्या निवडणुकीत चुरस निर्माण केली. तसेच दलित-मुस्लिम-कुणबी असा "डीएमके' फॉर्म्युला प्रचारात वापरला. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे उद्या स्पष्ट होणार आहे. 

रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांच्या विरोधात शेवटच्याक्षणी कॉंग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच अनेक नाट्यमय घडामोडी कॉंग्रेसमध्ये घडल्या होत्या. सुरुवातीला कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी गजभिये यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, हा विरोध नंतर मावळला. खासदार तुमाने आणि सरकारविरोधी जनमताचा त्यांना फायदा झाल्याचे बोलल्या जात आहे. रामटेकमध्ये अटीतटीची लढत झाल्याने येथील निकालाविषयी जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे. खासदार कृपाल तुमाने यांचे आपण आरामात दीड ते दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार असल्याचे म्हणने आहे. 

जनतेला विकास हवा आहे. जातीय राजकारण नको. पाच वर्षांत आपण कोट्यवधींची विकासकामे केली. त्यामुळे जनतेची पहिली पसंती आपणास आहे. सुमारे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी होऊ. विरोधकांचे जातीय कार्ड चालणार नाही. 
-नितीन गडकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Nitin Gadkari and Nana Patole in Nagpur constituency for Loksabha 2019