Election Results : शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची विजयाच्या दिशेने आगेकूच

Election Results : शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची विजयाच्या दिशेने आगेकूच

खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील लिड महत्वाचा ठरत असल्याच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाला आहे.

गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणूकींमध्ये घाटाखाली लिड आणि विजय असे समीकरणच बनले आहे. घाटाखाली तीन विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी मलकापूर हा मतदार संघ रावेर लोकसभा मतदार संघामध्ये येतो तर खामगाव व जळगाव जामोद हे बुलडाणा लोकसभा मतदार संघात येत असून दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. मागील लोकसभा निवडणूकीत खामगाव व जळगाव जामोद मतदारसंघातून लिड मिळाला होता. त्यामुळे यावेळी या मतदार संघातून प्रतापराव जाधव यांना किती लिड मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. परंतु यावर्षी सुध्दा दोन्ही मतदार संघातून जाधव यांना 70 हजारच्या वर लिड मिळाला असल्याने प्रतापराव जाधव यांच्या विजयात घाटाखालील लिड किती महत्वाचा ठरला हे स्पष्ट झाले आहे. शेवटच्या फायनल आकडेवारीत हा लीड वाढू शकतो.

बुलडाणा लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना व मित्र पक्ष युतीचे खासदार प्रतापराव जाधव, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत झाली. खा.प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक अवघड जाईल असे चित्र होते. मात्र मोदी करिष्मा प्रतापराव जाधव यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे , तसेच भाजपा आमदार व कार्यकर्त्यांनी दिलेली समर्थ साथ खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी जमेची बाजू ठरली. खासदार प्रतापराव जाधव यांची ही विजयाची हॅट्ट्रिक आहे. पहिल्या फेरी पासून शेवटच्या फेरी संपेपर्यंत खासदार प्रतापराव जाधव यांची आघाडी कायम राहिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र शिंगणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार फारसी जादू दाखवू शकले नाहीत. खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयामुळे भाजप शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

विजयात खामगावचा मोठा वाटा

खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयात खामगाव मतदार संघाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांना खामगाव विधानसभा मतदार संघात ३२ पेक्षा जास्त मतांचा लीड मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा मागील १ टर्म खामगावने भक्कमपणे साथ दिल्याने खासदार जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. खामगाव आणि जळगाव मतदार संघाने नेहमीच खासदार जाधव तारले आहे.

भारतीय जनता पार्टीला मिळालेले हे अभूतपूर्व यश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या जनहिताच्या कामामुळे, देशभरात केलेल्या विकास कामांची जनतेने दिलेली पावती आहे. विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली नाही. खामगाव मतदार संघात लीड देण्यासाठी आम्ही काम केले. कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमचे मार्गदर्शक दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्याई असल्याने खासदार प्रतापराव जाधव यांना खामगाव मतदारसंघातील मतदार बांधवांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. तसेच या विजयाद्वारे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून प्रचंड विजय मिळवून विरोधकांना झणझणीत चपराक लगावली आहे. माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार.

- अ‍ॅड. आकाश फुंडकर
आमदार , खामगाव विधनासभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com