Loksabha 2019 : बारामतीत दुपारी 12 वाजेपर्यंत 17.45 टक्के मतदान

मिलिंद संगई
मंगळवार, 23 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे. 

बारामती : लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे. 

लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पवार कुटुंबियातील प्रतिभाताई पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, देवयानी व ईरा  पवार यांनीही सुळे यांच्या सोबत रिमांड होम मध्ये मतदान केले. माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, विजयाताई पाटील, नीताताई पाटील, श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. 

भाजपच्या उमेदवार कांचन कुल, आमदार राहुल कुल यांनीही दौंड तालुक्यात मतदानाचा हक्क बजावला, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनीही तांदुळवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. 
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या एका पोलिंग एजंटला पोलिसांनी दोन तास जाणुनबुजून डांबून ठेवल्याचा आरोप नवनाथ पडळकर यांनी केला. दरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया शांततेत सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 point 45 percent vote in Baramati till 12 noon