Loksabha 2019 : भाजपने मला दिली होती मोठी ऑफर : तेजबहादूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

- भाजप नेत्यांकडून देण्यात आली होती मोठी ऑफर

- उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मोदींकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न.

वाराणसी : भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत आज (गुरुवार) मौन सोडले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक न लढण्यासाठी मला भाजपच्या नेत्यांकडून 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. 

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तेजबहादूर यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर सप-बसपमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी तेजबहादूर यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेजबहादूर यांच्याकडून दोन्ही नोटिसांना उत्तरही देण्यात आले. मात्र, उमेदवारी दाखल केल्यापासून पंतप्रधान मोदींकडून अडचणी निर्माण केल्या जात होत्या. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP gave me the big offer says Tej Bahadur Yadav