Loksabha 2019 : शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 13 एप्रिल 2019

उन्नाव - उन्नाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मी एक संन्याशी आहे. मला मतदान करा. जर मला मतदान केले नाही तर मी तुम्हाला शाप देईन, असे वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नाव येथे चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले आहे. शेखपुर येथे आज (शुक्रवार) साक्षी महाराजांची सभा होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच एक मत एक कन्यादानासारखे आहे, असेही साक्षी महाराज म्हणाले आहे. 

साक्षी महाराज यांच्या या सभचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Sakshi Maharaj threatens to put a curse on people who dont vote for him