Loksabha 2019 : 'कुमारस्वामींनी शंभरवेळा आंघोळ केलीतरी ते दिसतील रेड्यासारखे'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

-  पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरे

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी काळे आहेत. जर कुमारस्वामी यांनी शंभरवेळा आंघोळ केली तर ते रेड्यासारखे काळेच दिसणार, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार राजू कागे यांनी केले आहे. कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना कागे यांनी हे वक्तव्य केले. 

राजू कागे हे कर्नाटकच्या कागवाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. कुमारस्वामी यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कागे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर कागे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी काळे आहेत तर पंतप्रधान मोदी गोरे आहेत. कुमारस्वामी यांनी शंभरवेळा आंघोळ केली तर ते रेड्यासारखे काळेच दिसणार आहेत. 

काय म्हणाले होते कुमारस्वामी?

नरेंद्र मोदी रोज सकाळी उठतात आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मेकअप करतात. नंतर कॅमेरासमोर येतात. कारण मीडिया फक्त नरेंद्र मोदींना दाखवते तर दुसरीकडे आम्ही दिवसातून सकाळी एकदा आंघोळ करतो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चेहरा धुतो. त्यामुळेच कॅमेरांना आमचे चेहरे चांगले दिसत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Raju Kage controversial statements on Karnataka CM Kumaraswamy