Loksabha 2019 : 'भाजपचे संबित पात्रा म्हणजे बेडूक'

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

- संबित पात्रा आहेत पावसाळी बेडूक

- जास्त महत्त्व देण्याची नाही गरज.

नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित जाहीरसभेत नवज्योतसिंग सिद्धू बोलत होते. यावेळी संबित पात्रा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, पावसाळी बेडूक जेव्हा डराव...डराव...करत असतो. तेव्हा कोकीळ नेहमीच शांत राहते. कोणी कितीही आरडाओरड केली तरीही हत्ती त्याच्या वेगाने चालत राहतो.

तसेच सिद्धूंनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांची जेव्हा सत्ता होती, त्यावेळी या राज्यात सर्वाधिक बलात्कार झाले. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Spokesperson Sambit Patra is Like a Frog says Navjot Singh Sidhu