Loksabha 2019 : मुंडावळ्यासहीत तिने गाठले मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

मुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात.

उल्हासनगर : मुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात.

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मराठा सेक्शन मध्ये राहणाऱ्या सायली रणपिसे यांनी आपला देशप्रती असणारा मतदानाचा हक्क बजावला. सायलीचे सायंकाळी नाशिकमध्ये लग्न आहे. नाशिकमधील अभिजित जाधव यांच्याशी त्या आज विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नाच्या या शुभमंगल दिनी पहिले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले आणि त्यानंतर त्या लग्नाच्या ठिकाणी नाशिक पंचवटी येथे रवाना झाली.

सायली म्हणाली, माझ्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने मतदान करावे.आज मी नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण त्याच दिवशी मतदान आहे. याचा मला खूप आनंद होत असून नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride casts a vote in Ulhasnagar for Loksabha 2019