Loksabha 2019 : राहुल गांधी म्हणतात, 'मला तुमचा मुलगा, मित्र समजा'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

-  मला तुमचा मुलगा. खरा मित्र समजा.

वायनाड : मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की दक्षिणेतील मतदारसंघ देशासाठी महत्त्वाचा भाग आहे. दक्षिणेतील लोकांचा आवाज इतरांपेक्षा भक्कम आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच मला तुमचा मुलगा. खरा मित्र समजा, अशा शब्दांत त्यांनी मतं देण्याचे आवाहनही यावेळी जनतेला केले.

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर राहुल गांधी निवडणूक लढवित आहेत. आज पहिल्यांदाच त्यांची प्रचारसभा वायनाड येथे झाली. या प्रचारसभेदरम्यान ते म्हणाले, ''केरळ राज्य एकात्मकतेचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. राज्यात विविध जाती-धर्माचे लोक इथं ऐक्याने राहतात. त्यामुळे तुम्हालाच माहीत आहे, इतरांचा आदर करायचा कसा''. 

दरम्यान, वायनाडसह उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवित आहेत. आज त्यांची पहिलीच प्रचारसभा पार पडली. त्यावेळी त्यांनी मतं मागत निवडून देण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consider me your son best friend says Rahul Gandhi at first Wayanad rally