Loksabha 2019 : 'मोदींमुळे देश झाला उद्ध्वस्त'

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात रोज 20 तास काम.

- टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा.

पटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज 20 तास काम करत आहेत. त्यामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे, अशा शब्दांत बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. कन्हैयाकुमार यांनी ही टीका ट्विटरवरून केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विरोधकांकडून विविध मुद्यांवर टीका केली जात आहे. असे असताना आता कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे. देश उगच नाही उद्ध्वस्त होत आहे. 'चौकीदार'साहेब यासाठी रोज 20 तास काम करत आहेत. तेही कोणतीही सुट्टी न घेता''.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर भारतीय टपाल खाते मोठ्या आर्थिक संकटात असून, तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या तोट्याची आकडेवारी ही बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या तोट्याच्या आकड्याहून अधिक आहे, अशी माहिती समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Country is Destroyed because of Narendra Modi says Kanhaiya Kumar