Loksabha 2019 : पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हाणामारी; रांगेत उभ्या असलेल्या मतदाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी सातपासून सुरु झाले आहे. या मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदाराला जमावाने जोरदार हाणामारी केली.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी सातपासून सुरु झाले आहे. या मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदाराला जमावाने जोरदार हाणामारी केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघात घडली.  

मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातील बालीग्राम येथे काँग्रेस आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीने मतदानासाठी रांगेत उभा असलेला मतदार गंभीर जखमी झाला. जमावाच्या या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या हाणामारीत मृत्यू झाल्याने या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of A Voter In The Polling Station while he Stands For Voting in West Bengal