Loksabha 2019 : मी धजद पक्ष सोडला नाही; देवेगौडांनीच मला काढले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

मी धजद पक्ष सोडला नाही; देवेगौडा यांनीच मला पक्षातून काढून टाकले, अशी माहिती युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने केलेल्या पक्षांतराच्या आरोपावर ते गुलबर्गा येथे प्रतिक्रिया देत होते. 

बंगळूर : मी धजद पक्ष सोडला नाही; देवेगौडा यांनीच मला पक्षातून काढून टाकले, अशी माहिती युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने केलेल्या पक्षांतराच्या आरोपावर ते गुलबर्गा येथे प्रतिक्रिया देत होते. 

कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उमेश जाधव यांच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यावर प्रतिक्राया देताना भाजपचे माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक यांनी सिद्धरामय्या यांनीही पक्ष सोडून द्रोह केल्याचा आरोप केला होता. या आरोपावर सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, "मी सुरू केलेल्या अहिंद चळवळीमुळे धजदचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी मला पक्षातून कमी केले. मीहून धजद पक्ष सोडलेला नाही. अशोक यांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन बोलायला हवे होते. मागचा-पुढचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळ्याला, असे त्यांचे वक्तव्य आहे, अशी टीका त्यांनी अशोक यांच्यावर केली. 

उमेश जाधव यांना कॉंग्रेस पक्षाने सर्व काही दिले होते. आमदार म्हणून त्यांना पुढे आणले. परंतु, त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी कॉंग्रेस पक्षाशी द्रोह केला आहे. त्यांच्याप्रमाणे मी द्रोह केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deve Gowda pulled me out from party Says Siddaramaiah