Loksabha 2019 : सोशल मीडियामुळे बॅनर झाकोळले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 April 2019

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे बॅनर रस्त्यावर लागण्याचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात दिसून आले. त्याची जागा सोशल मीडियाममधील फेसबुकवरील पेजेस, यूट्यूब चॅनेल, व्हॉट्‌सअप ग्रुपने घेतली आहे. त्यामुळे बॅनर छपाई व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे बॅनर रस्त्यावर लागण्याचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात दिसून आले. त्याची जागा सोशल मीडियाममधील फेसबुकवरील पेजेस, यूट्यूब चॅनेल, व्हॉट्‌सअप ग्रुपने घेतली आहे. त्यामुळे बॅनर छपाई व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक चौकात प्रचाराचे अनेक बॅनर लागलेले असायचे. परंतु यंदाच्या निवडणुकीत त्याचे प्रमाण अत्यल्प होते. पाच वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढल्याने बॅनर छपाई व्यवसायावर जवळपास ५० टक्के परिणाम झाला आहे. बॅनरवर खर्च करण्यापेक्षा सोशल मीडिया टीमद्वारे थेट लोकांच्या वैयक्तिक व्हॉट्‌सॲप नंबरवर पाठवून प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची टीम सक्रिय होती. त्यामध्ये ट्‌विटरवर अपडेट करणे, उमेदवाराच्या समर्थनार्थ फेसबुकवर पेज सुरू करणे, त्यावर उमेदवाराची कामे, अनेक सकारात्मक गोष्टी टाकणे, तसेच विरोधी उमेदवाराच्या नावाने पेज सुरू करणे, त्यावर विरोधी उमेदवाराचे व्यंगचित्र काढणे, या गोष्टी मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्या. तसेच, फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार केले गेले. तसेच छपाईवर खर्च करण्यापेक्षा फेसबुकवर व्ह्युवर्स वाढविण्यासाठी ‘पेज बूस्टिंग’वर खर्च केला गेला. उमेदवारांच्या भाषणांचे पक्षाच्या आणि वैयक्तिक फेसबुक पेजला लाइव्ह करणे, तसेच वेगवेगळ्या नावाने यू-ट्यूब चॅनेल  सुरू केले. या निवडणुकीत डिजिटल प्रचारावरही उमेदवारांनी भर दिली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारामध्ये बॅनरचा वापर अतिशय कमी केला गेला. बॅनर लावल्यावर त्या परिसरापुरतेच मर्यादित असल्याने त्या जागी सोशल मीडियायाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे बॅनरवरील आराखडा सोशल मीडियासाठी द्यायला आम्ही सुरवात केली आहे.
- संदीप धनवे, छपाई व्यावसायिक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to social media the use of banner for campaigning for this year is very less