Loksabha 2019 : मोदी-शहा यांच्या क्लिन चिटबाबत निवडणूक अधिकाऱ्याचा होता विरोध

वृत्तसंस्था
रविवार, 5 मे 2019

- क्लिन चिटविरोधात निवडणूक आयुक्तांचा होता विरोध.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिली. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही क्लिन चिट देण्यात आली आहे. या क्लिन चिटला निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी विरोध दर्शवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान मोदींनी केलेल्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असा आरोप करत याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणातून त्यांना निवडणूक आयोगाकडून क्लिन चिट देण्यात आली. आचारसंहितेच्या उल्लंघनाचा हा प्रकार 21 एप्रिलला पटणातील एका रॅलीदरम्यान झाला होता. 

दरम्यान, 9 एप्रिलला लातूर आणि चित्रदुर्गमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना बालाकोटच्या एअरस्ट्राईकच्या नावाने मत देण्याचे आवाहन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EC Officer Opposed Clean Chits Given to PM Modi Amit Shah