Loksabha 2019 : मतदानाचा अमूल्य अधिकार प्रत्येक नागरिकाने समजून घ्यावा - मोहम्मद तय्यब्जी

सुचिता करमरकर
सोमवार, 22 एप्रिल 2019

कल्याण -  लोकशाहीतील मतदानाचा अमूल्य अधिकार प्रत्येक नागरिकाने समजून घेतला पाहिजे. ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे महापर्व साजरे करावे. असे आवाहन स्वीप निरीक्षक मोहम्मद तय्यब्जी यांनी केले.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने भारतातून दहा मतदारसंघांची निवड केली आहे. त्यात 24 कल्याण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. याअंतर्गत मतदान जागृती मोहिमेचा शुभारंभ आज कल्याणातील अत्रे रंगमंदिरात झाला; त्यावेळी तय्यब्जी बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, स्वीपच्या नोडल अधिकारी रेवती गायकर, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप योजनेअंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, पथनाट्य, फ्लॅश मॉब, बॅनर्स तसेच होर्डिंग्जच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अधिकाधिक मतदारांनी आपल्या या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असेही ते म्हणाले. यावेळी अत्रे रंगमंदिर ते कल्याण पत्री पूलापर्यंत एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 27 एप्रिल पर्यंत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पथक कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाविषयी जनजागृती करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every citizen should know the right to vote says Mohammed Taybaji