Loksabha 2019 : नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यावर लढून दाखवा : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

"हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटी या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा," असे आव्हान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना दिले. 

नवी दिल्ली : "हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटी या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा," असे आव्हान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना दिले. 

प्रियांका गांधी यांना आज दिल्लीत कॉंग्रेसच्या उमेदवार शीला दीक्षित, विजेंदरसिंह यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. या "रोड शो'वेळी त्यांना पाहण्यासाठी दुतर्फा लोक उभे होते. 

त्यादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, ""दिल्लीची मुलगी तुम्हाला खुले आव्हान देत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांत नोटाबंदी, जीएसटी, महिलांची सुरक्षा या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवा. देशातील तरुणांना जी आश्‍वासने दिली, त्या मुद्द्यावर बोला.'' 

"अभ्यास न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी मोदींची स्थिती आहे. जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा सांगतात, काय करू नेहरुजींनी माझा कागद घेतला आणि लपवला. मी अभ्यास केलेल्या कागदाची इंदिरा गांधींनी बोट बनवली आणि पाण्यात बुडवली,'' अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight on issue of GST and Demonetization says Priyanka Gandhi