मी खासदार म्हणून कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेईल : मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे : ''पालकमंत्री गिरीष बापट यांनी आमदार असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले; आता मी खासदार म्हणून कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेईल'', असे सांगत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपण पुण्याचे खासदार म्हणून निवडून येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी रविवारी व्यक्त केला. बापट हे भ्रष्ट पालकमंत्री असल्याने पुणेकर त्यांना मते देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले

पुणे : ''पालकमंत्री गिरीष बापट यांनी आमदार असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले; आता मी खासदार म्हणून कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेईल'', असे सांगत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपण पुण्याचे खासदार म्हणून निवडून येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी रविवारी व्यक्त केला. बापट हे भ्रष्ट पालकमंत्री असल्याने पुणेकर त्यांना मते देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
 
निवडणुकीतील प्रचार, त्यातील मुद्दे, मतदारांचा प्रतिसाद या पार्श्‍वभूमीवर जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे चेतन तुपे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. 

जोशी म्हणाले, "ही निवडणूक काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे हे यश मिळत आहे. भाजपकडे शंभर नगरसेवक, आमदार, खासदार असूनही पुण्यात काँग्रेसचा विजय असेल. ही निवडणूक धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी आहे. बापट यांनी तूरडाळ डाळ घोटाळा केला, त्यामुळे असा उमेदवार निवडून येणार नाही. बापट यांच्या निष्क्रियेतेमुळेच पुण्याचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे मी खासदार झाल्यानंतर मागील पाच वर्षांत जी कामे रखडली तीही मला करावी लागणार आहेत. '' 

"विविध संघटनांचा पाठिंबा वाढला असून, समाजातील बहुतांशी घटक आता पुन्हा काँग्रेसकडे आला आहे. निवडणुकीतील पहिल्यांदा मतदान करणार मतदारांचा कलही आम्हाला आहेत,'' असेही जोशी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will withdraw crime against activist MP: Mohan Joshi