Loksabha 2019 : मला उपपंतप्रधानपद द्या तरच...

वृत्तसंस्था
Saturday, 11 May 2019

- विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष होणार सहभागी. 

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष सहभागी होण्यास तयार आहे. याबाबतचे संकेत या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (शनिवार) दिले. तसेच आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपपंतप्रधानपदाची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीसाठीचे पाच टप्प्यांतील मतदान आत्तापर्यंत पार पडले. त्यानंतर आता सहाव्या टप्प्यातील मतदान आता घेण्यात येणार आहे. सात टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 23 मेला निकाल पुढे येणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच चंद्रशेखर राव यांनी आपल्याला उपपंतप्रधानपद हवे असल्याची मागणी केली. 

दरम्यान, येत्या 21 मेला सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीशी आणि काँग्रेसशी राव यांनी चर्चा केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: K Chandrashekar Rao Demanding Deputy Prime Minister Post