कारणराजकारण : वाढती गुन्हेगारी मोठी समस्या; कोथरूडमधील नागरिकांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

कोथरूड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासह त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. य भागात वाढती गुन्हेगारी मोठी समस्या आहे. वाहतूककोंडी आणि पार्किंगची गैरसोय, अशा समस्या आहेत. येणाऱ्या खासदाराने या समस्या सोडण्यासाठी लक्ष घातले पाहिजे, अशी कोथरूडवासीयांची मागणी आहे.

पुणे : कोथरूड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासह त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. य भागात वाढती गुन्हेगारी मोठी समस्या आहे. वाहतूककोंडी आणि पार्किंगची गैरसोय, अशा समस्या आहेत. येणाऱ्या खासदाराने या समस्या सोडण्यासाठी लक्ष घातले पाहिजे, अशी कोथरूडवासीयांची मागणी आहे.

कोथरूड भागामध्ये सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले आहे. मेट्रोचे काम जलद गतीने सुरू असले तरी, त्याच्या नियोजनामध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश केला नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे स्थानिक सांगतात. या भागामध्ये पीएमपी बस सेवेची अवस्था अतिशय खराब आहे. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. तसेच परिसरामध्ये पाण्याचा प्रश्नही गंभीर असून तो सोडवण्यासाठी
 लोकप्रतिनिधीनीं प्रयत्न करणे गरजेचे आहे.

'सकाळ'च्या 'कारणराजकारण' भाग २ मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड येथील स्थानिकांशी सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कोथरूड भागामध्ये वाढती गुन्हेगारी, पाण्याचा अपुरा पुरवठा, वाहतूक कोंडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अपुऱ्या सोयीसुविधा, अशा समस्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: KaranRajkaran discussion with citizens of kothrud