Election Tracker : मायावती आज काय म्हणाल्या?

mayawati
mayawati

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती?

25 एप्रिल, 2019

निवडणूक आयोगाच्या पाठींब्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आचारसंहितेचा भंग केल्याचे अनेक आरोप होऊनही मोकाट फिरत आहेत. त्यामुळेच ते महिलांचा अनादर करत आहेत. भाजप आणि राश्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर किती लाजवाब नेता लादला आहे.

24 एप्रिल, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाच्या बाबतीतही देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. आरक्षण कधीच संपुष्टात येणार नाही असे म्हणत असले तरी वास्तवात ही त्याची अजून एक 'जुमलेबाजी' आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपच्या काळातही एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची व्यवस्था पूर्ण निष्क्रिय झाली आहे

22 एप्रिल, 2019

मीडियाने जोरदार टीका करुनही निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत नसेल तर देशाच्या लोकशाहीसाठी ही फार मोठी चिंता आहे. यासर्वांचे जबाबदार दुसरं कोणी नसून भाजप आणि पंतप्रधान मोदीजी आहेत.

18 एप्रिल, 2019

नरेंद्र मोदींच्या विमानाची तपासणी रोखण्यासाठी लागणारा असा कोणता अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे? त्याउलट असे करणाऱ्या आईएएस पर्यवेक्षकाचे निलंबन करण्यात आले. अशी कारवाई चुकीची आहे असे बसपचे माजी सीईसी श्री कुरेशी यांच्या मताशी मी सहमत आहे. निवडणूक आयेगाने मोदींना सूट न देता निष्पक्ष काम करणे अपेक्षित आहे. 

17 एप्रिल, 2019

निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीचा यूपीचे मुख्यंमत्री वारंवार आचरसंहितेचा भंग करत आहेत. ते शहारातील प्रत्येक मंदिरात, दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहे. मीडियाही त्यांना प्रसिद्धी देत असल्याने त्यांचा प्रचार होत आहे. निवडणूक आयोग वारंवार योगी आदित्यनाथ यांची बाजी का घेत आहे?

15, एप्रिल, 2019 
भाजपच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मतदारांना धमकावल्यानंतर आता उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत काळे झेंडे दाखवल्यानंतर 'कायमचे बेरोजगार राहण्याची' उघड धमकी दिली आहे. हा जनतहिताच्या विरोधात आहे. यांना निवडणूकीत परभूत करण्याची गरज आहे. 

14, एप्रिल, 2019
भाजप नेत्यांनी विकास, काळा पैसा, भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी या विषयांवर भाष्य न करता राष्ट्रवाद, सुरक्षा या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचे ठरविले, पण जेव्हा याचाही उपयोग झाला नाही तेव्हा भाजप नेत्यांनी मतदारांना धमकवायला सुरवात केली. जसे की मनेका गांधी...

13 एप्रिल, 2019

जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली. सरकार या दु:खद घटनेसाठी ब्रिटीश सरकारकडे जाब मागून देशाच्या जनतेला आनंद देऊ शकेल का?

12 एप्रिल, 2019

भाजप आणि त्यांच्या नेत्यांना आता निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेला निधी कोणाकडून मिळाला आहे हे निवडणूक आयोगाला सांगणे अनिवार्य आहे. यामुळे येत्या काळात भाजप नेत्यांनी केलेली हौस मौज आणि मोठ्या प्रमाणावर केलेल्या खर्चाचे रहस्य उलगडणार आहे आणि भाजप मोठ्या अडचणीत येणार आहे.

11 एप्रिल, 2019

सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की देशाचे हित पाहणाऱ्या आणि जनतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या सरकारची निवड करण्याच्या हेतूने सर्वांनी मतदान करावे. प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचावे.  

10 एप्रिल, 2019 

राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली राफेल गैरव्यवहारात मोठा भ्रष्टाचार लपविण्याचा मोदी सरकारा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सर्वोच्च न्यायलयात भाजप पूर्णपणे तोंडावर पडली आहे. संसदेत आणि बाहेर वारंवार खोटं बोलणाऱ्या मोदींना देशाची माफी मागावी आणि संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. 
- ट्विटरवर

5 एप्रिल, 2019

भाजप आणि स्वतः मोदींना त्यांच्या पराभवाची प्रचंड भीती असल्यामुळे ते विरोधकांवर कोणतेही आरोप करत आहेत.  दहशतवाद्यांना सोडून देण्याची परंपरा भाजपची आहे बसपची नाही. दहशतवादी मसूद अझहरला सुद्धा भाजपनेच सोडले आहे आणि आता तो भारताची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

-ट्विटरवर

4 एप्रिल, 2019

भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी यापूर्वीच मोदींना भारत आणि भारताला मोदी म्हणण्याची चूक करुन देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. हीच चूक याआधी इंदिरा गांधीनीही केली होती. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. जनता यांना कधीच माफ करणार नाही 
- ट्विटरवर

3 एप्रिल, 2019

काँग्रेसचा जाहीरनामा हा पूर्वीप्रमाणेच दिखाऊ असून मायाजालप्रमाणे आहे. आश्‍वासनांविरोधातच काम करण्याच्या काँग्रेसच्या सवयीमुळे या पक्षाबद्दल लोकांमध्ये विश्‍वासार्हता राहिलेली नाही. 'ते एवढे घाबरले आहेत की समस्यांवर बोलण्याऐवजी भाजप या युतीमधील वरिष्ठ नेत्यांविषयी विनाकारण जातीयवादी वक्तव्ये करीत आहे. अशा वक्‍त्यांमुळे कोणीही संतप्त न होता निवडणुकीत चांगली कामगिरी करीत त्यांनी तोडीस तोड उत्तर द्यावे.

27 मार्च, 2019

काँग्रेस पक्षाचा गरिबि हटाओ 2.0 चा नारा खोटा आहे हे भाजपचे म्हणणे खरे असले तरी खोटी आश्वासने देणे आणि वचनाचा भंग करणे हा केवळ भाजपचाच अधिकार आहे का? गरिब, मजूरदार आणि शेतकऱ्यांच्या हितांची उपेक्षा करण्याच्या बाबतीत दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. 
ट्विटरवर

26 मार्च, 2019

नोटाबंदी हा अत्यंत अपरिपक्व निर्णय होता. त्याच्यामुळे श्रीमंत लोकांना काहीही त्रास झाला नसला तरी गोर गरिबांना याचे फार वाईट परिणाम सोसावे लागले आहेत. गरिबांना काम सोडून गावी परतावे लागले तसेच मोल मजूरी करुन घर चालवावे लागत आहे. भाजप माफी मागणार का?

25 मार्च, 2019

देशाला लागलेला गरिबी आणि बेरोजगारीचा शाप हा काँग्रेस आणि भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम आहे. ही समस्या 'हर हाथ को काम' या बसपच्या इच्छाशक्तीमुळेच दूर होऊ शकते. माझ्या काळात उत्तर प्रदेशमधील सर्व सामन्य जनतेला रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला होता.  

23 मार्च, 2019

एकीकडे मताच्या स्वार्थापायी पाकिस्तानविरुद्ध भडकावणारी वक्तव्य तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गोपनीय पत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या 130 कोटी जनतेसोबत असा खेळ खेळणे योग्य आहे का? लोकहो, यांच्यापासून सावध रहा

22 मार्च, 2019

भाजपच्या नेत्यांनी त्यांना हवं ते बोलून स्वत:ची करमणूक करुन घ्यावी. मात्र, असं करायच्या नादात त्यांनी देशाचा आणि संविधानाचा अपमान करु नये. संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेऊ नये. जी काही चौकीदारी करायची आहे ती निवडणूकीत पराभूत झाल्यावर करावी.
- ट्विटरवर

19 मार्च, 2019

'गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये चहावाला म्हणून प्रचार केला आणि या निवडणूकीमध्ये चौकीदार म्हणून प्रचार केला जात आहे.  व्वा, भाजपच्या सरकारमध्ये देश कसा बदलत आहे, सुंदर!

18 मार्च, 2019

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने येथील सर्व 80 जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास काहीच हरकत नाही. केवळ सप-बसपची आघाडीच भाजपला पराभूत करण्यास सक्षम आहे. उत्तरप्रदेशमधील आघाडीसाठी सात जागा सोडण्याचा संभ्रम काँग्रेसने तयार करण्याची गरज नाही.
- ट्विटरवर

16 मार्च, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन कार्यक्रम आणि प्रचारांतच व्यस्त आहेत आणि या सगळ्यावरच त्यांनी 3044 कोटी रुपयेही खर्च केले आहेत. ही सरकारी मालमत्ता त्यांना उत्तरप्रदेशसारख्या मागासलेल्या राज्यातील गावांमध्ये शिक्षण आणि रुग्णालयाच्या व्यवस्था देण्यात वापरता आली असती. मात्र, त्यांना लोककल्याणपेक्षी प्रचार जास्त महत्त्वाचा वाटत आहे
- ट्विटरवर

15 मार्च, 2019

बहुचर्चित राफेल विमान व्यवहारात स्वत:चा बचाव करण्यासाठी संसद आणि न्यायलयात मोदी ज्या प्रकारे आपले रंग बंदलत आहेत त्याने वारंवार त्यांचीच फजिती होत आहे. बोफोर्सप्रमाणेच राफेलही अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे प्रतीक बनत चालले आहे. कोणतेही सरकार देशहिताच्या बाबतीत एवढे निष्काळजी कसे असू शकते?

- ट्विटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com