Loksabha 2019 : अरविंद केजरीवाल यांना अज्ञात तरुणाने लगावली कानशिलात

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मे 2019

- रोड शोदरम्यान घडला हा प्रकार

- संबंधित तरुणाला घेतले ताब्यात.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना एका अज्ञात तरुणाने कानशिलात लगावली. मोतीनगर येथे प्रचारासाठी आयोजित रोड शोदरम्यान समाविष्ट झालेल्या गाडीवर चढून संबंधित तरुणाने हल्ला केला. 

अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर आरोप केले आहेत. यामध्ये सिसोदिया म्हणाले, आता मोदी आणि अमित शहा केजरीवाल यांची हत्या करू इच्छित आहेत का? मागील 5 वर्षांत पूर्ण ताकद लावली तरीदेखील ते जनतेचे मनोबल तोडू शकले नाहीत. आम्हाला ते कधीही निवडणुकीत पराभूत करू शकले नाहीत. आता त्यांच्याकडून केजरीवाल यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

दरम्यान, संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मोनिका भारद्वाज यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Slaps Delhi CM Arvind Kejriwal during his Roadshow