Loksabha 2019 : मावळ : पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्याला पकडले

शनिवार, 27 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघातील कामोठ्यामध्ये पैसे वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले आहे.

नवी मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातील कामोठ्यामध्ये पैसे वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले आहे.

मावळमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात लढत आहे. शेकापचे राष्ट्रवादीला समर्थन आहे. शेकापच्या कार्यकर्त्याला पकडल्यामुळे पार्थ यांच्यावरही हे प्रकरण शेकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शेकापच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना प्रत्येकी 400 रुपयांचे वाटप करताना पकडले आहे. 

दरम्यान, पैसे वाटप करण्याऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maval SKP party workers have been captured for distributing money