Loksabha 2019 : मोदी सरकारकडून माझा मानसिक छळ : वद्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

- मोदी सरकार आणि तपास यंत्रणांकडून होतोय मानसिक छळ. 

 

नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गरिबी, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले जात नाही. मात्र, प्रचारसभांमधून माझ्यावर टीका केली जात आहे. हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला'', असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी सांगितले. तसेच मोदी सरकार आणि तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होत आहे, असा आरोपही वद्रा यांनी यावेळी केला. 

एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वद्रा यांनी ही टीका केली. यामध्ये त्यांनी लिहिले, की सभांमध्ये माझे नाव ऐकून मला धक्का बसला. गरिबी, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण यांसारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे असतानाही तुम्ही इतर सर्व मुद्दे सोडून फक्त माझ्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच वर्षांत तुमच्या सरकारकडून माझा मानसिक छळ करण्यात आला. तसेच तपास यंत्रणा, न्यायालय आणि कर विभागाकडून फक्त माझ्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी वारंवार नोटीस पाठवण्यात आली''.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental Torture from the Modi Government says Robert Vadra