Loksabha 2019 : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोदींनी भरला अर्ज; भाजपचे दणक्‍यात शक्तिप्रदर्शन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करताना दणक्‍यात शक्तिप्रदर्शन केले. मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षातील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संबंध ताणले गेलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. 

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करताना दणक्‍यात शक्तिप्रदर्शन केले. मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षातील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संबंध ताणले गेलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. 

अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधत मोदी यांनी वाराणसीमध्ये सलग दोन दिवस जोरदार वातावरण निर्मिती केली. राजनाथसिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज या केंद्रीय मंत्र्यांसह नितीश कुमार, उद्धव ठाकरे, ओ. पनीरसेल्वम आणि रामविलास पासवान हे मित्र पक्षांचे नेतेही वाराणसीत दाखल झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील कालपासून पंतप्रधान मोदी यांच्याच सोबत दिसत आहेत. 

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. 'लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होईल की नाही', अशी शंकाही उपस्थित केली जात होती. त्यातच ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करून भाजपला एकप्रकारे इशाराच दिला होता. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षांतील तणाव निवळला आणि युतीची घोषणा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi filed nomination in presence of Uddhav Thackeray in Varanasi