Loksabha 2019 : 'मोदींनी जेट विमानांचा वापर खासगी टॅक्‍सीप्रमाणे केला'

पीटीआय
शुक्रवार, 10 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांचा वापर "खासगी टॅक्‍सी'प्रमाणे केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने आज केला आहे. मोदींनी निवडणूक प्रचारासाठी जेट विमान वापरताना केवळ 744 रुपये भाडे भरले, असा दावा कॉंग्रेसने केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांचा वापर "खासगी टॅक्‍सी'प्रमाणे केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने आज केला आहे. मोदींनी निवडणूक प्रचारासाठी जेट विमान वापरताना केवळ 744 रुपये भाडे भरले, असा दावा कॉंग्रेसने केला. 

माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. "दिशाभूल आणि खोटेपणा हाच मोदींचा आधार आहे. हवाई दलाच्या विमानांनाही तुम्ही टॅक्‍सीसारखे वापरले. स्वतःच केलेल्या चुकांपासून पळताना तुम्ही इतरांकडेच बोटे दाखवत आहात,' असे सुरजेवाला म्हणाले.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, भाजपने जून 2014 ते जानेवारी 2019 या कालावधीतील बिगर सरकारी देशांतर्गत विमानप्रवासासाठी हवाई दलाला 240 उड्डाणांचे 1.4 कोटी रुपये दिले. यापैकी 15 जानेवारी 2019 ला केलेल्या प्रवासासाठी तर केवळ 744 रुपये दिले, असे अहवालात म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi used jet planes as private taxi says Congress