Loksabha 2019 : मुख्यमंत्री म्हणतात, 'मोदी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात गुजरातचे नव्हे'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील अवकाळी पावसामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्द्ल सहानभूती दर्शविनारे ट्विट केल्याने, काँग्रेसकडून त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही. अशी टिका करणारे ट्विट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे.

देशातील गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला. परंतु, नरेंद्र मोदींनी वयक्तिक ट्विट करताना केवळ गुजरातमधील नागरिकांविषयीच सहानभूती दाखवली आहे. मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, गुजरातमध्ये अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसात मृत्यूमुखी पडलेल्या शुर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.  आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत केली जाईल.

त्याच्या काही काळानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटरवरून मोदींनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि मणिपूरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त केले व मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली.

यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटकरून त्यांची नाराजी व्यक्त केली. केवळ गुजरातच नाही तर मध्यप्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तुमच्या संवेदना केवळ गुजरात पुरत्याच मर्यादीत आहेत. नरेंद्र मोदी तुम्ही फक्त गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. असे त्यांनी मोदींना ट्विट मधून सुनवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi you are PM of India not Only Gujrat