Loksabha 2019 : प्रज्ञासिंहांच्या वक्तव्यावरून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल; केंद्रीयमंत्र्यांचे वक्तव्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

- प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानावर अनंतकुमार हेगडे यांचे समर्थन

नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानावर आता केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी समर्थन केले आहे. सात दशकानंतर सध्याची पिढी याबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल, असे अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले.  

प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील. गोडसेला दहशतवादी म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असे विधान प्रज्ञासिंह यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे हेगडे यांनी समर्थन केले आहे. 

हेगडे म्हणाले, सात दशकानंतर सध्याची पिढी एका बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसेबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून गोडसेलाही आनंद झाला असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathuram Godse Finally Felt Happy With This Debate says Anantkumar Hegde