कारणराजकारण : तर तुम्ही राजकारणातून संन्यास घेऊन दाखवा : अमोल कोल्हे

सचिन बडे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

शिरुर लोकसभा हा मतदारसंघ हा खूप नशिबवान आहे. या मतदारसंघात शिवाजी आणि संभाजी महाराज स्मृतिस्थळे आहेत. येथून विमानतळ जाणे हा आढळरावा यांच्या अदुरदुष्टीपणाचा परिणाम आहे. विमानतळाबाबत आढळराव कमी पडले. तसेच ससूनच्या रुग्णालयाच्या धर्तीवर हडपसर येथे रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर पुणे- नाशिक मार्ग आणि रेल्वे मार्ग न होणे, बैलगाडा शर्यद बंद पडणे, हे आढळरावांचे अपयश आहे, असे कोल्हे म्हणाले. 

मालिकेवर बोलताना कोल्हे म्हणाले, "संभाजी यांच्यावरील मालिका कधीही बंद होणार नाही." तसेच मालिका आणि राजकारण हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Candidate from Shirur Loksabha Amol Kolhe speaks in karanrajkaran series