Loksabha 2019 : पुणे जिल्ह्यातील चारही जागा युतीलाच : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- वंचित काय करतो, किंचित काय करतो हे मी पाहत नाही

- पुणे जिल्ह्यात चारही जागा युतीलाच

- माझ्या विकास कामांचा मला नक्कीच फायदा होणार

पुणे : सकाळच्या सत्रात महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी कुटुंबियांसह मतदान केले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणावरही टीका केलेली नाही तर त्यांच्यावर झालेल्या टीकांकडे जास्त लक्षही दिले नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

''निवडणूकीच्या प्रचारामध्ये मी कुणावरही टोकाची टीका केलेली नाही. माझ्यावर झालेली टीका ही अदखलपात्र आहे. घटनेच्या चौकटीत, लोकशाही मार्गाने तरुणांनी मतदान करावे. देशात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद मतदानामध्ये आहे म्हणूनच मतदानाबाबात सर्वांनी गंभीर असले पाहिजे.
मतदान करणे जिवंत लोकशाहीची लक्षणे आहेत. काही अपवाद वगळता सगळीकडे मतदान सुरळीत सुरू आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

''शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा मला मोठा फायदा होणार आहे. मी इतर पक्षांच्या आणि उमेदवारांच्या कामाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वंचित काय करतो किंचित काय करतो हे मी पाहिले नाही. मात्र, बारामती मतदार संघाकडे माझे लक्ष आहे. पुणे जिल्ह्यात चारही जागा युतीला मिळतील,'' असेही मत त्यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA will win all 4 seats in Pune Loksabha Constituency in Loksabha 2019 says Girish Bapat