Pune Loksabha 2019 : सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- सकाळी नऊपर्यंत 12.15 टक्के मतदान 
- सकाळी अकरापर्यंत 12.66 टक्के मतदान 
- दुपारी एकपर्यंत 22.58 टक्के मतदान 
- दुपारी तीनपर्यंत 33.04 टक्के मतदान 
- दुपारी चारपर्यंत 34.01 टक्के मतदान 
- दुपारी पाचपर्यंत ३७.१२ टक्के मतदान
- सांयकाळी सहापर्यंत 44.45 टक्के मतदान
- सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. आज सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली. शहरात सुमारे 21 लाख मतदार असून 1944 मतदान केंद्र आहेत. 

पुण्यात भाजप शिवसेनायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापैकी कोण बाजी मारेल याबाबत चर्चा सुरु आहे. एकीकडे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्यामुळे ते मताधिक्याने निवडुन येतील अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु आहे तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गिरीश बापट ते मताधिक्याने निवडुन येतील अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे. नक्की ही लढत कोण जिंकेल हे आज पुण्यातील मतदारराजाच ठरवेल. 

दरम्यान पुण्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 12.15 टक्के, सकाळी अकरा पर्यंत 12.66 टक्के, दुपारी एक पर्यंत 22.58 टक्के, दुपारी तीन पर्यंत 33.04 टक्के, दुपारी चार पर्यंत 34.01 टक्के, दुपारी पाच पर्यंत ३७.१२ टक्के, सांयकाळी सहापर्यंत  44.45 टक्के, सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के मतदानाची नोंद झाल्याची समजते. शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: percent polling in Pune Loksabha Constituencies