कारणराजकारण : उरणच्या विकासावरुन युती-आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

'कारणराजकारण' उपक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांशी स्थानिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

उरण(रायगड) : ''घारापूर परिसरात पोचविण्यात आलेली वीज, नगरपालिकेला विकासकामासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेला शंभर कोटी पेक्षा जास्त निधी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) रस्ता आठ पदरी केला जात आहे.'', ही विकास कामे उरण तालुक्यात करण्यात आल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तर, विरोधक ''जेएनपीटीवर कंपनींना थेट परवानगी (टीपीटी) दिल्याने गेलेले रोजगार, विकासाची संथ गती'' ,असे आरोप विरोधकांनी केले.

'कारणराजकारण' उपक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांशी स्थानिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

उरण नगरपरिषदेत भाजप सत्तेत आहे. तर, शिवसेना विरोधी पक्षात आहे. मात्र, लोकसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. या पक्षाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडीला बळ मिळाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये भाजप-सेनेची ताकद वाढलेली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Workers did Discussion on Issue of Uran Development