Loksabha 2019 : शरदजी तुम्हाला हे शोभते का? : नरेंद्र मोदी 

Narendra modi
Narendra modi

औसा : शरद पवारजी तुम्ही कोणाबरोबर उभे आहात. काँग्रेसकडून देशाला काही अपेक्षा नाही. पण, तुम्हाला हे शोभते का? शरद पवार तेथे शोभत नाहीत. देशात दोन पंतप्रधान हवे असलेल्यांसोबत तुम्ही उभे आहात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रथमच सभेसाठी एकत्र येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाई नेते रामदास आठवले आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, की एवढ्या उन्हातही तुम्ही जी तपस्या करत आहात, ते मी कधीच वाया जाऊ देणार नाही. तुमचा आशीर्वादच मला काम करण्यासाठी कायम प्रेरित करतो. मोठमोठी लक्ष्ये गाठण्यासाठी हीच प्रेरणा उपयोगी ठरतो. मराठवाडा अनेक संकटाला तोंड देत आहे. चौकीदारावर तुम्ही विश्वास ठेवला आहे. चौकीदारावर आपला 5 वर्षाचा विश्वास आहे, त्यावरून संकल्पित भारत देशासमोर ठेवला आहे. राष्ट्रवाद आपली प्रेरणा असून, सुशासन आपला मंत्र आहे. याच भावनेवर नव्या भारताची निर्मिती होणार असून, यात नागरिकांचा सहभाग हवा आहे. 

काँग्रेसला हवेत दोन पंतप्रधान
दहशतवाद्यांच्या तळांवर घुसून मारू, अशी भारताची नवी निती आहे. दहशतवाद्यांना पराभूत करूच. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही एक विश्वास निर्माण केला असून, तेथील परिस्थिती सामान्य होत आहे. नक्षलवाद्यांवर प्रहार केला असून, आदिवासींच्या विकासासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे. तुमचे आशीर्वादच माझी ताकद आहे. संस्कृती, परंपरा यांचे रक्षण केले पाहिजे की नाही. चौकीदारावर तुमचा विश्वास आहे ना? काँग्रेसची विचारधारा देशविरोधी आहे. काश्मीरमधून कलम 370 हटविले जाणार नाही, असे काँग्रेस जाहीरनाम्यातून म्हटले आहे.

पाकिस्तान पण हेच म्हणत आहे. काँग्रेस देशद्रोहाचा कलम रद्द करणार अशी घोषणा करते, हेच पाकिस्तानला हवे आहे. भारताविरुद्ध काम करणाऱ्यांना काँग्रेसकडून मोकळीक दिली जात आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असती तर फाळणीच झाली नसती आणि पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती. काँग्रेसला देशाला उत्तर द्यावेच लागेल. काँग्रेसला देशात दोऩ पंतप्रधान हवे आहेत. आजकाल सगळे माझ्यामागे पडले आहेत. भारताने पाकिस्तानचा कोणतेच विमान पाडले नाही, हे सगळे तेच बोलत आहेत. माध्यमांमध्ये जागा बनविण्याची प्रयत्न करत आहेत. काँग्रेसवाल्यांना आणखी किती पुरावे हवे आहेत. आपल्याला आपल्या जवानांवरच विश्वास नाही, अशांना शिक्षा देणे गरजेचे आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यात येईल. जुनी व्यवस्था बदलण्याचे काम करण्यात येत आहे. निवडणुकीनंतर नव्या सरकारकडून लहान शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. किसान क्रेडिटच्या माध्यमातून एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे. त्यासाठी व्याज नसेल. निवडणुकीनंतर देशात नवी व्यवस्था शेतकरी निवृत्तीवेतन योजना सुरुवात करणार येईल. 60 वर्षांच्या शेतकऱ्याला निवृत्तीवेतन दिले जाईल. देशात 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यात येईल. गरिबांच्या घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येतील. संकल्पपत्रापुरते आम्ही मर्यादीत राहत नाही. त्यापेक्षा आम्ही जास्त करतो. सामान्य नागरिकांना आम्ही 10 टक्के आरक्षण दिले.

पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूकीत जे तरूण-तरूणी पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांना आवाहन केले. ज्यांनी एअर स्ट्राईक केला, योजना आणल्या अशा पक्षालाच करा. तुम्ही गर्वाने सांगाल की आम्ही मोदींना मतदान केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com