Loksabha 2019 : राहुल गांधी 'गाली गँग'चे प्रमुख : नक्वी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर लक्ष ठेऊन निवडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

- मुख्तार अब्बास नक्वी, भाजप नेते

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर वारंवार खोटं बोलत आहेत. काँग्रेसमध्ये 'झूठ मेव जयते'च्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणात खोटे आरोप लावले जात आहेत, असे भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी हे 'गाली गँग'चे प्रमुख आहेत, असेही नक्वी म्हणाले.

राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यासाठी मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नक्वी म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 'गाली गँग' चे प्रमुख आहेत. राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर वारंवार खोटं बोलत आहेत. काँग्रेसमध्ये 'झूठ-मेव जयते' असे सुरु आहे. याच आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणात खोटे आरोप लावत आहे.

तसेच आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर लक्ष ठेऊन निवडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, असेही नक्वी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi is the leader of Gali Gang says Mukhtar Abbas Naqvi