Loksabha 2019 : 'मी लाभार्थी', 'डिजीटल इंडिया'ची राज ठाकरेंकडून पोलखोल

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

- विदर्भात नुसते टॉवर उभे केले पण इंटरनेट नाहीच.

- 'मी लाभार्थी' जाहिरातीतील लोक बेरोजगार.

मुंबई : विदर्भातील पहिल्या डिजीटल गावाची आम्ही तेथे जाऊन अवस्था पाहिली. नुसते टॉवर उभे केले पण इंटरनेट तेथे नाही. विद्यार्थ्यांना टॅब अद्याप मिळालेले नाहीत. मी लाभार्थी या भाजपच्या जाहिरातीतील लोक आज तिथे बेरोजगार आहेत, अशी पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आयोजित केलेल्या गुढीपाढवा मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. राज ठाकरेंनी यावेळी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीवर जोरदार टीकास्त्र सोडत इतकं स्पष्ट बहुमत असताना मोदींनी देशाची वाट लावली असे म्हटले.

राज ठाकरे म्हणाले, की सरकारने डिजीटल इंडियाचा नुसार डोंगारा उभा केला आहे. लोकांनी किती फसवायच, किती खोटं बोलायच हे भाजपने केले. मोदी आता जात, धर्म यावर भाषण देत आहेत. पण, नोटाबंदी, विकास, जीएसटीबद्दल ते काहीच बोलत नाहीत. मोदी-शाह जोडगोळी ही देशासमोरचं संकट आहे. भाजपला अच्छे दिन आणणाऱ्या लालकृष्ण अडवानींची आज भाजपमध्ये अवहेलना होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticizes PM Modi on issues of Me Labharthi and Digital India Schemes