Loksabha 2019 : राजकारणातील फुटीरतावाद, नकारात्मकता हटवा : प्रियांका गांधी

पीटीआय
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जी व्यक्ती खोटे बोलतात आणि तुमच्यासाठी काम करीत नाहीत, त्यांना तुम्ही मान्यता देऊ नका. 

- प्रियांका गांधी, सरचिटणीस, कॉंग्रेस 

फतेहपूर (उत्तर प्रदेश) : "राजकारणातील फुटीरतावाद आणि नकारात्मकता हटवून पुढील पिढीचा विचार करा व देश वाचवा,'' असे आवाहन कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी मतदारांना केले.

निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या, ""केवळ तुमचा भाग आणि तुमच्या गरजांपुरते केवळ राजकारणात बदल करू नका, तर तुमच्या पुढील पिढीसाठी आणि देशाला धोका असल्याने देशाचा बचाव करण्यासाठी तो करा. फुटीरतावादाचे आणि नकारात्मकतेचे राजकारण हटवा. जे राजकारण तुमच्याबद्दल, तुमच्या चिंतांबद्दल बोलते त्यावर विश्‍वास ठेवा आणि लोकशाहीत जनतेच्या शक्तीपेक्षा मोठे काहीही नसते. म्हणूनच तुम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. ती तुमची सर्वांत मोठी शक्ती आहे.

मत देणे हा तुमचा अधिकारही आहे आणि शस्त्रही आहे. या शस्त्राचा वापर विवेकबुद्घीने करा.'' फतेहपूर मतदारसंघात सातव्या टप्प्यात 6 मे रोजी मतदान होणार आहे.

Web Title: Remove Negativeness of Politics says Priyanka Gandhi