आता खरोखरीच भाजप 300 पार! सर्वच एक्झिट पोलचा अंदाज!

रविवार, 19 मे 2019

'अब की बार, किसकी सरकार' या प्रश्नाचं ढोबळ उत्तर आज (रविवार) एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहे.

एक्झिट पोल 2019 : 'अब की बार, किसकी सरकार' या प्रश्नाचं ढोबळ उत्तर आज (रविवार) एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहे. विरोधक आणि राजकीय विश्लेषकांनी नाकारलेली मोदी लाट यंदाही मतदानामध्ये प्रभावी ठरल्याचे चित्र असून विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजांनुसार, भाजपप्रणित 'एनडीए'च पुन्हा स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल होईल.

देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. त्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे अंदाज वर्तविण्यास सुरवात झाली. 

रिपब्लिक टीव्ही आणि सीव्होटर यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये 'एनडीए' स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल, असे चित्र आहे. असा आहे यांचा अंदाज :
एनडीए : २८७
यूपीए : १२८
महागठबंधन : ४०
इतर : ८७

टाईम्स नाऊ-व्हीएमआर यांच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला तीनशेहून अधिक जागा मिळतील.

असा आहे यांचा अंदाज :

एनडीए : ३०६
यूपीए : १३२
इतर : १०४

इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणानुसारही एनडीएच तीनशेच्या जवळपास जागा मिळवून पुन्हा सत्ता स्थापन करेल.

असा आहे यांचा अंदाज :

एनडीए : २९८
यूपीए : ११८
इतर : १२६

एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलनुसारही पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच केंद्रात सत्ता स्थापन करणार आहेत.

त्यांचा अंदाज असा आहे :

एनडीए : ३००
यूपीए : १२७
इतर : ११५

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपची एनडीए आघाडी सव्वातीनशेहून अधिक जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवेल. त्यांचा अंदाज असा आहे :

एनडीए : ३३६
यूपीए : ५५
इतर : १४८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Saam Exit Poll results BJP to win in India