Loksabha 2019 : '23 मेनंतर उतरेल इटलीचा रंग'

वृत्तसंस्था
Saturday, 11 May 2019

- 'सिद्धूंना इटलीच्या रंगावर गर्व करण्याची नाही गरज.

- इटलीचा रंग उतरेल येत्या 23 मेला निकालानंतर.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'काळे इंग्रज' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धूंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सिद्धूंना इटलीच्या रंगावर गर्व करण्याची गरज नाही. हा रंग येत्या 23 मेला निकालानंतर उतरेल. सिद्धूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांसाठी जे शब्द वापरले त्यांचा वापर करण्यास लाज वाटत आहे''.

पात्रा म्हणाले, ''पंतप्रधान मोदींना काळे इंग्रज आणि सोनिया गांधी यांना भारतीय म्हणणे हा कुठला न्याय आहे. मोदीजी काळे असले तर काय झाले. पण ते दिलवाले आहेत. मोदीजी काळे असले तर काय झाले ते गरिबांचे रखवाले आहेत. मोदीजींना काळे समजणाऱ्यांना समजले पाहिजे, संपूर्ण भारत त्यांच्यावर प्रेम करतो आणि मोदीजीही संपूर्ण देशावर प्रेम करतात". तसेच पंतप्रधान मोदींना काळे म्हणून त्यांनी संपूर्ण भारताचा अपमान केला आहे.

दरम्यान, सिद्धूजी आणि काँग्रेसने आपल्या इटलीच्या रंगावर इतका गर्व करू नये. त्यांचा हा रंग येत्या 23 मेला उतरेल, असेही संबित पात्रा म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambit Patra criticizes on Navjot Singh Sidhu