Satara Loksabha 2019 : उदयनराजेंच्या गडात चारपर्यंत एकूण 44.58 टक्के मतदान

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 23 April 2019

आज दुपारी चारपर्यंत वाई - 43.87 टक्के, कोरेगाव : 43.78 , उत्तर कराड : 45.64 ., दक्षिण कराड : 45.59, पाटण : 43.43, सातारा : 45.22 असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले होते.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी चारपर्यंत एकूण 44.58 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात एलाखो मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

आज दुपारी चारपर्यंत वाई - 43.87 टक्के, कोरेगाव : 43.78 , उत्तर कराड : 45.64 ., दक्षिण कराड : 45.59, पाटण : 43.43, सातारा : 45.22 असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना-भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले. दरम्यान अनफळ ता. खटाव येथे मतदान यंत्र बंद पडल्याने एकही मतदान झाले नाही. झोनल अधिकार्‍यांनाही काही करता येईना. मशीन कधी सुरु होईल हे सांगता येत नसल्याचे केंद्रप्रमुखांचे स्पष्टीकरण दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale cast vote with family in Satara