Loksabha 2019 : यापुढे निवडणूक लढविणार नाही : सुशीलकुमार शिंदे़

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- भाजपकडे विकासासाठी कोणताही अजेंडाच नाही

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नाही, असे आज (मंगळवार) स्पष्ट केले. 

सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, जातीय राजकारणामुळे डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. भाजपचे सरकार असताना त्यांनी एकही प्रकल्प सोलापुरात आणला नाही. त्यांच्या पक्षाने खासदार, मंत्रिपदं भूषविले आहेत. मात्र, त्यांच्याकडून सोलापूरकरांसाठी काहीही केले गेले नाही. काँग्रेसने 'कुछ नहीं किया', असा आरोप वारंवार केला जात आहे. मात्र, काँग्रेसने 'सब कुछ किया', असे ते म्हणाले. 

दरम्यान, भाजपकडे विकासासाठी कोणताही अजेंडाच नाही. या निवडणुकीत मला निवडून द्या, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will not contest the elections again says Sushilkumar Shinde