#MarathaKrantiMorcha पक्षांमध्ये अस्वस्थता

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 31 July 2018

मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले. 

राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. सरकारचा निष्काळजीपणा व एकहाती हाताळणीमुळे आंदोलनात अधिकच भर घातल्याचा आरोप या पक्षांच्या बैठकीत आमदारांकडून करण्यात आला. सर्वच पक्षांच्या आमदारांनी आंदोलन हाताळण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला.

वाट कसली पाहता
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना मागास आयोगाच्या अहवालाची वाट कसली पाहत बसला आहात. विधिमंडळात कायदा करून मराठ्यांसह धनगर, लिंगायत, महादेव कोळी, जंगम व मुस्लिमांच्या मागण्या कायद्याने मान्य करा. राज्याच्या कायदेमंडळाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारला मंजूरी साठी पाठवा, असे आवाहन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मातोश्री’वर आज शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आंदोलन फोडण्याचा प्रयत्न
गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन ज्या प्रकारे हाणून पाडले, त्याच धर्तीवर मराठा आंदोलनही फोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने महाराष्ट्र अस्थिर झालेला असताना मुख्यमंत्री मात्र राजकीय हेतूनेच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत राज्यातील चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

संयमाचा अंत पाहू नका
मराठा, मुस्लिम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता तातडीने निर्णय जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाबाबत विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पक्षाच्या सर्व आमदारांची विधिमंडळातील कार्यालयात बैठक बोलावली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha political Parties discomfort