#MarathaKrantiMorcha राज्यात एसटी सुरू;पण धास्ती कायम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात एसटीला लक्ष्य केल्याने आठ दिवस ही सेवा विस्कळित झाली होती; पण आता आंदोलकांनीच एसटी सुरू ठेवण्याची विनंती केल्याने बससेवा हळूहळू मार्गावर आली आहे. असे असले तरी पुन्हा कधीही भडका उडण्याच्या शक्‍यतेने महामंडळ धास्तावलेले आहे.

या आंदोलनाच्या काळात सर्वाधिक झळ बसलेल्या एसटीच्या तब्बल ६० बस लक्ष्य ठरल्या. यामुळे महामंडळाचे ३१ लाखांचे नुकसान झाले. आंदोलन काळात सेवा बंद पडल्याने एसटीचा तब्बल २० कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता एसटी गाड्यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले होते. याला काही संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला हाेता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus starts in state but fears persist