esakal | कृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यात सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यात सुरू

मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठीचे विमान अखेर शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आकाशात झेपावले. 

कृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यात सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठीचे विमान अखेर शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आकाशात झेपावले. 

मराठवाड्यात असमान व अत्यल्प पावसाचा अंदाज  पाहता कृत्रिम पावसाचा प्रयोगाची मागणी होती. या अनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर गुरुवारी (ता. ८) डॉपलर रडारची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पूर्ण झाले.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्यानंतर विभागीय आयुक्‍तालय व आएमडीचे तज्ज्ञ यांनी शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या कृत्रिम पावसाचा चाचणी प्रयोग होणार  असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रयोगासाठी आवश्‍यक विमानाचे आगमन झाले. विमानतळावर शास्त्रज्ञ आणि वैमानिकांचे महसूल उपायुक्‍त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत निंबाळकर यांनी स्वागत केले. 

विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोलरूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली. 

औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात आकाशात ५० किलोमीटर अंतरावर बीजरोपणासाठी आवश्‍यक ढग असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दिशेने विमानाने कूच केले. मिळालेल्या माहितीनुसार ढगांवर मेघबीजारोपण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रयोगाचे नेमके काय फलित झाले, हे तूर्त स्पष्ट झाले नव्हते.

loading image