पाणी टंचाईचा पहिला बळी; पाय घसरल्याने तरुणीचा विहिरीत पडून मृत्यु

दीपक सोळंके
शनिवार, 6 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभांचा धुराळा राज्यभर उडत आहे. अशात मराठवाड्यातील वर्षानूवर्षाच्या पाणी प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या निवडणूकीच्या प्रचारातूनही पाण्याचा मुद्दा गायब आहे. हंडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात जिवावर उदार होत पाणी मिळवावे लागत आहे. 

भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील पाणी टंचाईनेच या तरुणीचा बळी घेतल्याचे गावकऱ्यांनी म्हणणे आहे.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभांचा धुराळा राज्यभर उडत आहे. अशात मराठवाड्यातील वर्षानूवर्षाच्या पाणी प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या निवडणूकीच्या प्रचारातूनही पाण्याचा मुद्दा गायब आहे. हंडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात जिवावर उदार होत पाणी मिळवावे लागत आहे. 

भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त भागात प्रशासनकडून टँकरद्वारे तसेच विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, हा प्रयत्न अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे. याच पाणी टंचाईने शनिवारी (ता. 6) भोकरदन तालुक्यात पहिला बळी घेतला आहे. 

गोकुळ येथील काही महिलांसह दीपाली शिंदे ही सकाळी कपडे धुण्यासाठी गावाजवळील केळणा नदी पात्रा शेजारी असलेल्या एका विहीरीवर गेली होती. दरम्यान कपडे धुण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असतांना दीपालीचा पाय घसरला व ती सरळ विहिरीत पडली. या घटनेत तिच्या कानाजवळ डोक्याला गंभीर मार लागला. गावकऱ्यांनी तिला तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A girl lost her life as she fell in well because of of Water Scarcity