औसा (लातूर) : मुख्यमंत्र्यांचं नाक अद्याप शाबूत । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

  • अभिमन्यू पवार आघाडीवर
  • बसवराज पाटील १७ हजारांनी मागे

औसा (जि. लातूर) : बाराव्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना 54 हजार 363 मते, तर बसवराज पाटील यांना 36 हजार 977 मते मिळाली आहेत. या फेरीपर्यंत अभिमन्यू पवारांना 17386 मतांची आघाडी आहे. 

औसा विधानसभा मतदारसंघात 1952 पासुन आजपर्यंत 13 वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या असुन त्यात कॉंग्रेसच्या उमेदवाराने तब्बल 8 वेळा नेतृत्व केले असून त्यानंतर दोन वेळा शिवसेना, एस कॉंग्रेस एकवेळेस शेकाप आणि कॉंग्रेसने नेतृत्व केले आहे. त्यापैकी कॉंग्रेसचे देविसिंग चौव्हाण वगळता कोणासही मंत्रीपदाचा मान मिळाला नाही.

सन 1948 साली मराठवाडयाला स्वातंत्र्य मिळाले. तो हैद्राबाद स्टेट मधुन महाराष्ट्रात सामील झाला. त्यानंतर सन.1952- 62 या काळात जेष्ठ स्वातंत्रसेनानी देविसींग चौव्हाण हे औसा मतदारसंघात निवडुन येऊन राज्यात मंत्री झाले. त्यानंतर सन.62 च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार मल्लीनाथ महाराज यांनी देविसींग चौव्हाण यांचा पराभव करून ते आमदार झाले.परत 1967 साली झालेल्या निवडणुकीत पंचायत समीती औसा चे सभापती असलेले विश्वंभरराव मुसांडे यांनी शेकापचे आमदार मल्लीनाथ महाराजांचा पराभव करून निवडून आले. सन.1972 साली झालेल्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री केशवराव सोनवणे यांनी कॉंग्रेसतर्फे औसा विधानसेची निवडणुक लढवीली व ते निवडुन आले.त्यानंतर कॉंग्रेस पक्षात फुट पडली आणि इंदीरा कॉंग्रेस व कॉंग्रेस निर्माण झाले. नंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा केशवराव सोनवणे यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणुक लढवुन विजयी झाले.

सन.1980 साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एस कॉंग्रेस पक्षातर्फे शिवशंकरप्पा उटगे यांनी निवडुन लढवुन ते विजयी झाले. पुढील सन.1985 च्या निवडणुकीच्यावेळी त्यांनी इंदीरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षातर्फे निवडुकीस उभे राहीले पण त्यांचा एस कॉंग्रेसचे उमेदवार किसनराव जाधव यांनी पराभव केला नंतर एस कॉंग्रेस आय कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्याने ते पुन्हा दोन वेळा विधासभेच्या निवडणुका लढऊन विजयी झाले व मतदारसंघाचे तब्बल सलग तिनवेळा निवडून येण्याची हॅट्रीक केली असली तरी मंत्रीपद त्यांच्यापासुन कोसो दुर राहीले.

सन 1999 च्या निवडुकीत त्यांचा त्यांचेच कार्यकर्ते दिनकरराव माने यानी शिवसेनेतर्फे निवडणुक लढवुन पराभव केला.त्यांनी टर्म मतदारसंघाचे नेतृत्व केले.परंतु सन.2009 साली कॉंग्रेसतर्फे बसवराज पाटील यांनी निवडणुक लढवुन माने यांचा पराभव केला.त्यावेळीच्या कॉंग्रेसच्या शासन काळात आमदार बसवराज पाटील यांनी शासनाच्या विविध खात्यामार्फत अनेक योजना मंजुर करून घेतल्या आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Ausa Latur trends middle phase