राज्यातील पशु चिकित्सालयांच्या वेळेत झाला बदल ; पशुपालकांना होणार सोयीस्कर

अनिल जोशी
Wednesday, 6 January 2021

सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशुपालक गाव शहर किंवा संकलन केंद्रावर दूध घालायला जातात. सकाळी दूध घालून परत आल्यावर तसेच संध्याकाळी दूध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो.

झरी (परभणी) : पशु पालनाच्या पद्धतीत काळानुसार झालेला बदल या पार्श्वभूमीवर राज्यात पशु चिकित्सलयाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चिकित्सालयाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत सुरु राहणार आहे.

राज्यभर पशुपालक पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने नोंदवला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशुपालक गाव शहर किंवा संकलन केंद्रावर दूध घालायला जातात. सकाळी दूध घालून परत आल्यावर तसेच संध्याकाळी दूध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याच दरम्यान ते आपल्या जनावरांना उपचारासाठी पशुचिकित्सालय आत आणू शकतात. त्यामुळे पशुचिकित्सालय वेळेत बदल करण्याची मागणी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुवर्धन सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पशु चिकित्सलयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होती.

असा आहे वेळेत बदल

- सकाळी नऊ ते साडे चार
- शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एक
- लंच ब्रेक 1ते 1:30

राज्यातील बहुतांशी पशुचिकित्सालय जिल्हा परिषद करीत अखत्यरित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांकडून या पार्श्वभूमीवर अभिप्राय मागवण्यात आले. त्यानंतर वेळेत बदल करण्याचे धोरणात्मक निर्णय घेतला गेला. सकाळी शेतीकामे आटोपून पशुपालक आता पशुचिकित्सालय येतील, त्यामुळे त्यांची सोय होईल.
- सचिद्र प्रताप सिंह, आयुक्त पशुसंवर्धन पुणे

पशुपालकांच्या पद्धतीत बदल झाल्याने पशुचिकित्सकाच्या वेळेत बदल करण्याची मागणी पशुपालक ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केला होता तो पूर्णत्वास गेला आहे.
- डॉ. अजय धमगुंडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना महाराष्ट्र तथा पशुविकास अधिकारी, झरी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state veterinary clinic will be open from 9 am to 4.30 pm