
बहुजन समाज पक्ष (बसप) राज्यातील विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार आहे.
Vidhan Sabha 2019 : बसप लढवणार सर्व जागा स्वबळावर
औरंगाबाद - बहुजन समाज पक्ष (बसप) राज्यातील विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार आहे. गुरुवारपासून (ता. बारा) विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरवात होणार असल्याची माहिती पक्षाने प्रसिद्धिपत्रकाद्वो दिली.
पत्रकात म्हटले, पक्ष राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. विदर्भातील 62 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या 12, 13 व 14 सप्टेंबरला नागपुरातील बसपच्या विभागीय कार्यालयात होणार आहेत. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील जागेसाठी 16 ते 20 सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मुंबईच्या प्रदेश कार्यालयात होणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत केंद्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रामआचल राजभर, केंद्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे घेणार आहेत. यावेळी संबंधित झोनचे इनचार्ज उपस्थित राहतील. औरंगाबाद झोनसाठी दोन इनचार्ज डॉ. ना. तु. खंदारे, प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद झोन इनचार्ज रवींद्र गवई, जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे उपस्थित राहतील.
Web Title: Vidhan Sabha 2019 Bsp Contest 288 Seats
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..