esakal | मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूबाबत दिली मोठी माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूबाबत दिली मोठी माहिती

मुख्यमंत्र्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा की नाही यावर भाष्य केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूबाबत दिली मोठी माहिती

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी आज संवाद साधला आहे. या फेसबूक लाईव्हच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा की नाही यावर भाष्य केलं आहे. 

नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्यानं लावू शकतो. मात्र धन्यवाद द्यायचे आहेत कारण बरेच लोक सूचनाचे पालन करताहेत.  70-75 टक्के लोक पालन करत आहेत पण उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असं म्हटलं जात आहे. मात्र ते कसं थांबवायचं? आपण धीम्या गतीनं पुढे जात आहोत. सावध अशी पावलं उचलत आहोत. आपल्याला अनुभवातून शहाणपण आलं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

नाईट कर्फ्यू आणि पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काही जणांनी नाईट कर्फ्यू लागू करण्यासाठी सूचवले आहे. काही जणांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे सांगितले आहे. पण मला वाटत नाही की, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची गरज नाही,  अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यू लागू करण्यास नकार दिला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाऊन लागू केलंय. पण कोरोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा व्हायरस हा कोरोनापेक्षा अधिक झपाट्यानं पसरतोय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अनेकदा गर्दी होत असते. मात्र त्या ठिकाणी आता पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-  हिंदुस्थानात लोकशाहीचा अतिरेक म्हणजे काय?, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

आजारापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी आहे. त्यामुळे मास्क हे सार्वजनिक ठिकाणी वापरावेच लागणार आहे. नवी वर्षांचे स्वागत करत असताना सावध राहा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Chief Minister Uddhav Thackeray gave big information lockdown and night curfew

loading image
go to top