esakal | "अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा नाही" - देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

"अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा नाही" - देवेंद्र फडणवीस

"अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा नाही" - देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं कोणतही वचन दिलं नव्हतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. 5 वर्ष टिकेल असं सरकार स्थापन करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. येत्या 8 तारखेआत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.  

दरम्यान दिवाळीत महायुतीच्या अधिकृत आणि अनधिकृत बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये गुप्त बैठकांचं सत्र सुरु आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. महायुतीच्या फॉर्म्युल्यावरुन बैठकांचा जोर वाढल्याचंही  पाहायला मिळतंय. यातच शिवसेना अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं समजतंय. आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतेय आणि शिवसेनेची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

काय म्हणालेत मुख्यमंत्री :  

 • निवडणुका चांगल्या पार पडल्या..
 • महायुतीला चांगला प्रतिसाद मिळाला..
 • आम्ही लवकरच सरकार स्थापन करू..
 • काही ही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल..
 • उद्या बैठक आहे, त्यात नेता कोण हे स्पष्ट होईल..
 • फर्स्ट क्लास फर्स्ट अलोत, पण आमच्या मेरिट बद्दल कोणचं बोलत नाहीत..
 • सत्तास्थापनेचा मुहूर्त लवकरच कळेल, लवकरच फॉर्म्युला कळेल..
 • A प्लानच आहे B प्लान नाही..
 • पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला.. 
 • ज्या शेतकऱ्याने भाजपचा ड्रेस घालून आत्महत्या केली त्याच्या नावावर एक ही एकर शेती नाही..
 • अमित शहा उद्या येणार नाहीत..
 • अधिकृत आणि अनधिकृत आमच्या बैठका सुरू आहेत
 • अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा केला नव्हता.. 


शिवसेनेकडे पर्याय उपलब्ध

भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय. निवडणुकी आधी जो फॉर्म्युला ठरलाय, त्यावर शिवसेना आग्रही आहे. शनिवारी झालेल्या बैठकीतही शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस उलटले, तरी सत्ता स्थापनेबाबतच्या हालचालींना महायुतीत म्हणावा तसा वेग आलेला नाहीये. या आधारावरच महायुतीत तणाव असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच नाही, तर हरियाणातील सत्ता स्थापनेवरुही राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. 

Webtitle : CM fadanvis claims that there is no formula for cm CM post sharing for two and half years

loading image
go to top