काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचं नाव आघाडीवर

पूजा विचारे
Tuesday, 19 January 2021

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे.या पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव तसेच राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे. 

मुंबईः  महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नसताना आताच आलेल्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचं समजतंय. तसंच या पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव तसेच राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे. 

मात्र गुजरात विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथले प्रभारी असलेले राजीव सातव हे राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून येण्याची शक्यता कमी दिसत आहे. तर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या संध्या सव्वालाखे या तेली समाजाचे असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तेली समाजाचे असलेले वडेट्टीवार येण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर आहे. नाना पटोले हे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं होतं.  दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली.

हेही वाचा-  'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'

दुसरीकडे काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.

Name Nana Patole post Congress State President Rajiv Satav vijay wadettiwar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Name Nana Patole post Congress State President Rajiv Satav vijay wadettiwar