esakal | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

सुरक्षा वाढवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये अभिनेता शत्रूघन सिन्हा यांना व्हाय प्लस एसकोड आणि यु डी निकम यांना झेझ सुरक्षा देण्यात आलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झेड प्लस काढून व्हाय प्लस स्कॉड देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून व्हाय प्लस इस्कॉड देण्यात आली आहे. 

राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिला होता. पोलिसांनी दिलेल्या अहवालात फडणवीसांच्या त्यांच्या जीवाला अनेक बाजूनं धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच अहवालात फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारसही करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणेनं हा अहवाल दिला आहे. मात्र असे असतानाही फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मिरा-भाईंदर पालिकेकडून 100 कोटींची करवसुली; गतवर्षाच्या तुलनेत 20 कोटींहून अतिरिक्त महसूल

 Thackeray government Decision Devendra Fadnavis bjp leaders Raj thackeray security Reduce

loading image
go to top